आष्टा/प्रतिनिधी
आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाला आयडीया लॅब सुरु करण्यासाठी भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मंजुरी मिळाली, अशी माहिती संस्थेचे सचिव ॲड. चिमण डांगे यांनी दिली. ॲड. चिमणभाऊ डांगे म्हणाले, नवी दिल्ली येथील तंत्रशिक्षण भारतीय परिषदेने मान्यताप्राप्त संस्थांमध्ये आयडीया (आयडिया, डेव्हलपमेंट, इव्हॅल्युएशन अँड ॲप्लिकेशन) लॅबसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये संशोधनाला चालना देणे आणि उद्योजकतेची संस्कृती रुजवणे हा आहे. ही योजना डिझाइन विकिंग, उत्पादन विकास, प्रोटोटायपिंग आणि व्यावहारिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यास मदत करणार आहे. ही प्रयोगशाळा तयार करण्यासाठी एक कोटी दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी जास्तीतजास्त ५० टक्के निधी भारतीय तंत्रशिक्षण परिषद देणार आहे.
विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान केवळ पुस्तकातून आणि वर्गात न शिकता कृतीतून शिकण्याला प्रोत्साहित करणे आणि संशोधनाला प्रोटोटाईपपर्यंत कार्यान्वित करणे गरजेचे असल्याने ही आयडीया लॅब गरजेची असल्याचे मत प्रा. आर.ए. कनाई यांनी व्यक्त केले.
वास्तविक समस्या सोडवण्याची
आणि व्यावहारिक अनुभव मिळविण्याची संधी या प्रयोग शाळेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना प्राप्त होणार आहे. यातून समस्या सोडवण्याची क्षमता, वस्तुनिष्ठपणे विश्लेषण व परीक्षण करण्याची क्षमता, सहयोगातून काम करण्याची क्षमता, सुसंवादाची क्षमता, मानसिक कौशल्ये यांचे प्रशिक्षण आयडीया लॅबमधून मिळेल. उद्योग, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांसोबत सहकार्याच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करता येणार त्यांनी दिली. असल्याची माहितीही
आयडीया लॅबद्वारे विविध कार्यशाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ट्रेनिंग, इंटर्नशिप प्रोग्रॅम, कौशल्यविकास कार्यक्रम विज्ञान-तंत्रज्ञान प्रदर्शन, तंत्र परिषद घेण्यास देखील मदत होणार आहे. ज्याद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र संशोधन आणि प्रोजेक्ट करू शकतील, प्रत्यक्ष उत्पादनाला चालना मिळेल. विद्यार्थ्यांमधील कल्पनांना चालना मिळेल. स्वतःला व्यक्त करण्याची संधी यानिमित्ताने मिळेल. भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या सर्व सर्व निकषांची पूर्तता डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली असल्याने आयडीया लॅब प्रायोजित झाल्याचे समाधान असल्याचे मत डांगे अभियांत्रिकी महाविद्यालायचे संचालक डॉ.एल.वाय. वाघमोडे यांनी व्यक्त केले. आयडिया लॅबचे समन्वयक म्हणून डॉ. मनोज जायय डॉ. संतोष मोहिते कामकाज पहात आहेत.