कोल्हापूर : प्रतिनिधी

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ४९ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली.
बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, यावर भर दिला जातो. त्यासाठी विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना करून दिली जाते. हे प्रशिक्षण चार महिन्यांकरिता असून, या काळात विद्यार्थ्यांना हॉटेल्समधील सर्व विभागांत काम करण्याची संधी मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य रुधीर बारदेस्कर, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर सूरज यादव यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
