जयसिंगपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा गोंधळ

जयसिंगपूर / प्रतिनिधी

कोल्हापूर-मिरज पॅसेंजर जयसिंगपूर स्टेशनवर एक तास थांबवल्याने मिरजेकडे जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर बुधवारी (ता.७) गोंधळ घातला. मिरज स्थानकावर उतरून लगेचच प्लॅटफॉर्मवर लागणारी लोंढा रेल्वे चुकल्यामुळे लोंढ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे रोखून काही काळ जाब विचारला. प्रवाशांनी लोंढा रेल्वेसाठी केलेले बुकिंगचे पैसे द्या अशी मागणी करत गोंधळ घातला.
कोल्हापूरमधून सुटलेली कोल्हापूर-मिरज रेल्वे रुकडी, हातकणंगले बरोबरच जयसिंगपूर रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबवण्यात आली. पॅसेंजर, वंदे भारत रेल्वेमुळे जवळपास एक तास रेल्वे जयसिंगपूर स्थानकावरून खोळंबली. मिरज स्थानकावर पोहोचल्यावर लागणाऱ्या गाडीचे आरक्षण प्रवाशांनी केले होते. मात्र, रेल्वे रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर स्थानकावर जवळपास दीड तास गाडी थांबल्याने लोंढा गाडी चुकल्याने प्रवाशांनी रेल्वे चालकाला जाब विचारला. नोकरदार व प्रवासी या रेल्वेतून प्रवास करत होते. कोल्हापूरमधून रेल्वे सुटल्यानंतर मिरज स्टेशनवर पोहोचल्यानंतर लगेचच मिरजेतून लोंढा रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांनी तिकीट अरक्षण केले होते.
कोल्हापूर-मिरज रेल्वे रुकडी, हातकणंगले व जयसिंगपूर स्थानकावर जवळपास पावणेदोन तास खोळंबल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तर लोंढ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी याचा जाब विचारत काही काळ जयसिंगपूर स्थानकात गोंधळ घालत रेल्वे रोखून धरली.

Scroll to Top