इचलकरंजी न्यायालयात पोक्सो कायद्यावर व्याख्यान संपन्न

इचलकरंजी/ प्रतिनिधी

पूर्वी फक्त लहान मुलींचे अत्याचार विरोधातील कायद्यात तरतुदी होत्या. पण नव्या कायद्यांतर्गत पीडित हा मुलगा असो किंवा मुलगी असो सर्वच लहान मुलांना व्याख्येत समाविष्ट केले आहे. लैंगिक गुन्ह्यात वाईट हेतूने फक्त स्पर्श जरी केला तरी तो गुन्हा होतो. तसेच मोबाईलमध्ये लहान मुलांवरील अश्लील व्हिडिओ जतन करणे हा देखील गुन्हा आहे, अशी माहिती जिल्हा न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी दिली.
इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने माजी जिल्हा न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांचे पोक्सो कायद्यावर व्याख्यान आयोजित केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी पोक्सो कायद्या अंतर्गत अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितल्या.
इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी बार असोसिएशनचे वकील ए.टी.तांबे यांना सीनियर वकील एम. डी. जमादार यांचे हस्ते आणि आर.व्ही. मुदगल यांचा वकील व्ही. बी. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर अॅड. इरफान जमादार यांच्या हस्ते माजी जिल्हा न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास असोसिएशनचे उपाध्यक्ष राजाराम सुतार, सेक्रेटरी अभिजीत माने, जॉइंट सेक्रेटरी आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी दिपाली हणबर, कार्यकारणी राहुल काटकर महेश कांबळे व शैलेंद्र रजपूत यांचे सहकार्य लाभले. सदरचे व्याख्यान अॅड. डी एम लटके यांच्या पुढाकाराने आयोजित केले होते. यावेळी मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होता.

Scroll to Top