काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक

भंडारा / प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता भंडारा जिल्ह्यातील सुकळी (महालगाव) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला भंडारा गोंदियाचे खा. प्रशांत पडोळे, दोन्ही जिल्ह्यांतील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आजी-माजी आमदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीराबाईंच्या पश्चात दोन मुले विनोद पटोले (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी) व आ. नाना पटोले, दोन विवाहित मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Scroll to Top