कोल्हापूर / प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेत चाटे शिक्षण समूहाच्या १४३ विद्यार्थ्यांनी ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. चाटे शिक्षण समहाच्या यावर्षीच्या निकालासंबंधी बोलताना संचालक प्रा. डॉ. भारत खराटे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश उल्लेखनीय आहे. बारावीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले यश हे विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, चाटे पॅटर्नचे योग्य नियोजन आणि विद्यार्थी पालकांनी दाखविलेला विश्वास याचा संयोग आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मिहीका कुंभोजकर (९३.३३), आयुष पोवार (९२.६७), श्रिया पाटील (९२.३३), दिव्या चोडणकर (९२), विनीत वडीणगेकर (९०.८३), विशाल हुजरे (९०.५०), ओम फराकटे (८९.६७), आयुष जाधव (८८.६७), श्रेयस फराकटे (८८.५०), चैतन्य जाधव (८८), अंजालना अत्तार (८८.००), मयुरेश देवाडीगा (८८) आदी यशस्वी विद्यार्थ्यांचे समूहाचे अध्यक्ष प्रा. मच्छिद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे यांनी अभिनंदन केले आहे.

