कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
शिवजयंतीनिमित्त शिलेदार हायकर्स फाऊंडेशनतर्फे गुरुवारी (दि. २०) किल्ले पन्हाळा येथे स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. पन्हाळा नगरपरिषदेच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहेसकाळी ७ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात होणार आहे. मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सात वाजता अंबरखाना येथे उपस्थित राहावे, असे आवाहन फाऊंडेशनचे संचालक नितीन पाटील, ओंकार पावले, श्रीधर कांबळे यांनी केले आहे.
