इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरात वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच बनली आहे. रस्त्याच्या कडेला असलेले बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. बेशिस्त पार्किंगमुळेदेखील अनेकदा नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. असाच प्रकार मध्यवर्ती बस स्थानकाजवळील राजाराम स्टेडियम मधील पार्किंगवरून दिसून येत आहे. त्या ठिकाणी विशेषतः दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय केलेली आहे. परंतु सध्या तेथे खाऊगाड्याचे पार्किंग होत असल्याने त्याठिकाणी येत असलेल्या दुचाकीस्वारांचा पार्किंगसाठी गोंधळ उडालेला दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने वाहतूक कोंडी व पार्किंगच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन ते सोडवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

