बोरपाडळे / प्रतिनिधी
श्री क्षेत्र पैजारवाडी येथे सद्गुरू चिले महारांज भंडारा महोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणासह मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह राज्यातील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते.
श्री क्षेत्र पैजारवाडी येथे सद्गुरू चिले महाराज यांची ४० वी पुण्यतिथी व भंडारा महोत्सवाची सुरुवात रविवार, दि. २० रोजी अखंड नामविना व ज्ञानेश्वरी पारायणाने झाली. भंडारा उत्सवानिमित्त शनिवार, दि. २६ रोजी सकाळी ‘श्रीं’च्या मूर्तीस अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष, बाबासाहेब चव्हाण, व्यवस्थापक बाबुराव गराडे, जयसिंग पारखे, बळवंत घोसाळकर, चंद्रप्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

