कोल्हापूर / प्रतिनिधी
आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सोलर बेबी लाईट संघाने रॉयल कोरिओग्राफर संघाचा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. विजयी संघाला ११ हजार रुपये व विजेतेपदाचा चषक देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या संघाला ९ हजार तर तृतीय क्रमांकाच्या मास्टर ऑफ आर्टस् संघाला ७ हजारांचे बक्षीस देण्यात आले.
विजेत्या संघाला चित्रपट व्यवसायातील नामांकित आर्ट डायरेक्टर संतोष फुटाणे यांच्याकडून, उपविजेत्या संघास कै. बाळासाहेब झगडे यांच्या स्मरणार्थ तर तृतीय क्रमांकाचा चषक कै. माधव (वसंत) पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात आला. बक्षीस समारंभ आर्ट डायरेक्टर संतोष फुटाणे, रमेश चावरे (अध्यक्ष कोल्हापूर वॉटर एटीएम), रवींद्र पदारे (अध्यक्ष राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँक), पद्मप्रभू रणदिवे (डायरेक्टर पी एल एम सिस्टीम), सर्वेश जाधव यांच्या हस्ते झाला. यावेळी सतीश बिडकर, विजय शिंदे निमति, सदानंद सूर्यवंशी, बाळासो बारामते, कमिटी सदस्य अमर मोरे, रणजित जाधव, दीपक महामुनी, अजय खाडे यांच्यासह सर्व संघाचे खेळाडू चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते.
