कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
कोल्हापूर स्पोर्टस् असो. – (केएसए) तर्फे खुल्या गटासाठी – छत्रपती राजाराम महाराज चषक टी–२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. १८ फेब्रुवारीपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा होईल. यातील विजेत्या संघास २५ हजार व चषक आणि उपविजेत्या संघास १५ हजार रुपये व चषक बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी दि. १५ फेब्रुवारीपर्यंत ‘केएसए’च्या छत्रपती शाहू स्टेडियमवर संपर्क साधण्याचे आवाहन क्रिकेट सचिव नंदकुमार बामणे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
