सीए’ची परीक्षा पुढे ढकलली

कोल्हापूर / प्रतिनिधी

भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धाची परिस्थिती पाहून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाने (आयसीएआय) मे महिन्यात होणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटंट फायनल, इंटरमीजिएट व पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. कोल्हापुरातून या परीक्षेला सुमारे ८५४ विद्यार्थी बसले होते.
‘आयसीएआय’च्या वतीने या परीक्षा ९ मेपासून होणार होत्या. यात अंतिम परीक्षेला बसणारे २०४, इंटरमीजिएटचे ३५४ व फाऊंडेशनचे २९६ विद्यार्थी आहेत. आयसीएआय सीए फायनल व इंटर वेळापत्रकानुसार, सीए फायनल परीक्षा २, ४ आणि ६ मे २०२५ रोजी घेण्यात आली. सीए इंटरमीजिएट ग्रुप १ च्या परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी झाल्या. तथापि, आयसीएआय सीए फाऊंडेशन अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत. परीक्षेच्या नवीन तारखा योग्य वेळी जाहीर केल्या जातील.

Scroll to Top