महाराष्ट्राची कर्नाटकातील बससेवा बंद : प्रवाशांची गैरसोय

निपाणी / प्रतिनिधी

कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये सुरू असलेल्या भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कन्नड समर्थक गटांनी शुक्रवारी राज्यव्यापी बंद पुकारला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दिवसभर कर्नाटकातील बससेवा बंद ठेवली. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली. मात्र, महाराष्ट्रात कर्नाटकची बससेवा सुरळीतपणे सुरू होती.
१५ दिवसापूर्वी चित्रदुर्ग येथे झालेल्या घटनेमुळे सलग ४ दिवस लांब पल्ल्यासह आंतरराज्य मार्गावरील दोन्ही राज्यांची बससेवा बंदच होती. शुक्रवारी दिवसभर बसे सवा बंद झाल्याने बसस्थानकातील महाराष्ट्र फलाट मोकळेच पडले होते. तर इतर फलाटांवरही प्रवासी, मजूर, विद्यार्थी व कामगारांची वर्दळ कमी दिसत होती. महाराष्ट्रातून कागल निपाणी मार्गे जाणाऱ्या गडहिंग्लज, चंदगड, उत्तूर, आजरा, कोवाड, सावंतवाडी, सिंधुदुर्ग या बसेस थेट महामार्गावरून जात होत्या. देवचंद महाविद्यालयापासून स्थानिक महाराष्ट्र बसेस माघारी जात होत्या. बेळगाव, चिक्कोडी, निपाणी आगाराने महाराष्ट्रात जाणाऱ्या सर्व बसेस शनिवारी सुरू ठेवल्या होत्या. त्याचा लाभ प्रवाशांना झाला. मात्र हुबळी, धारवाड, गदग, होसपेट, राणेबेन्नूर, हावेरी, दांडेली, भटकळ, गंगावती या विभागाच्या बसेस निपाणी आगारात थांबून होत्या. काही बसेस निपाणी बस स्थानकातून माघारी फिरत होत्या.

Scroll to Top