पंढरपूर/प्रतिनिधी
समस्त वारकरी मंडळ मौजे गोंदवले बुद्रुक, (ता. माण) यांच्या वैष्णव नगर, (पंढरपूर) येथील नियोजित वास्तूचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले.
गोरे म्हणाले, गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र नगरीतले गोंदवलेकर महाराजांचे निस्सिम भक्त गोंदवलेकर महाराजांची पालखी घेऊन विठुरायाच्या नगरीत मोठ्या भक्ती भावाने येतात. पंढरपुरात येणाऱ्या गोंदवले येथील वारकरी भाविकांना समस्त वारकरी मंडळाची नियोजित वास्तूमुळे भजन, कीर्तन, धार्मिक सोहळे याबरोबरच राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह वारकरी, भाविक उपस्थित होते.

