पैजारवाडी येथे रविवारपासून भंडारा महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर / प्रतिनिधी

पैजारवाडी (ता. पन्हाळा) येथील परमपूज्य सद्‌गुरू चिले महाराज समाधी ट्रस्टतर्फे दि. २० ते २७ एप्रिल या कालावधीत श्री चिले महाराज भंडारा महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवाचे हे ४० वे वर्ष असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महोत्सव काळात काकड आरती, अभिषेक, त्रिकाल आरती, भजन, कीर्तन, प्रवचन, अखंड नामविणा व ज्ञानेश्वरी परायण होणार आहे.
पारायणाची वेळ सकाळी ८ ते १० आणि १०.३० ते दुपारी १२ अशी आहे. शनिवारी (दि. २६) सकाळी ११ पासून महाप्रसाद वाटप व सायंकाळी ५ वाजता पालखी ग्रामदक्षिणा सोहळा होईल. संत नामदेव महाराज यांचे १७वे वंशज एकनाथ नामदास महाराज (पंढरपूर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने रविवारी (दि. २७) महोत्सवाची सांगता होईल. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष संयोजक बाबासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

Scroll to Top