‘भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी’ – महंत नामदेव शास्त्री देशमुख कुटुंबीयांनी घेतली नामदेव शास्त्रींची भेट

बीड प्रतिनिधी

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची काल रविवारी भेट घेतली. सर्व आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कुंडली धनंजय देशमुख यांनी महंत शास्त्री यांच्यासमोर मांडली. त्यानंतर देशमुख कुटुंबीय हे भगवानबाबांना मानणारे असून, जातीय सलोखा राखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे भगवानगड सदैव राहील, अशी ग्वाही महंत शास्त्री यांनी दिली.

देशमुख कुटुंबीय व महंत नामदेव शास्त्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी देशमुख कुटुंबीय आणि वंजारी समाजाचे सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे धनंजय देशमुख यांनी पुराव्यानिशी पटवून दिले. २२ वर्षांपासून आपली शेती वंजारी समाजातील मुंडे कुटुंबीय करीत असल्याचेही त्यांनी महंत शास्त्री यांच्या निदर्शनास आणून दिले.

मी जे शब्द बोललो, त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींची तशी मानसिकता का झाली असावी? कारण ॲक्शनची रिॲक्शन होण्यापूर्वी घटना टाळता आली असती, असे मला म्हणायचे होते. परंतु या वाक्याचा विपर्यास करण्यात आला, असे नामदेव शास्त्री यांनी सांगितले.

Scroll to Top