कोल्हापूर / प्रतिनिधी
चुरशीच्या अंतिम सामन्यात तामगावच्या श्रीशा स्पोर्टस्वर २ धावांनी मात करून शिरोळ तालुका संघाने महाजन कदम ग्रामीण चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. जिल्हा क्रिकेट असो. आयोजित ही स्पर्धा शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर झाली.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शिरोळ तालुका असो. ने २० षटकांत ८ बाद १४६ धावा केल्या. आकाश मानेने ५० धावा केल्या. श्रीशा स्पोर्टस्कडून अजय बांटुगेने ३, संतोष गवळीने २ विकेटस् घेतल्या. उत्तरादाखल श्रीशा स्पोर्टस्चा संघ २० षटकांत ९ बाद १४४ धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यांच्या नीळकंठ जगतापने ४४ धावा केल्या. शिरोळ संघाकडून विवेक शिकलगारने ३, अमोल कुंभारने २ विकेटस् घेतल्या. विजेत्या संघात रणजित माने, आकाश माने, तेजस सुतार, उत्कर्ष कोळी, आदित्य कदम, कुमार पत्रा, अभिजित बुवनाळे, अमोल भोजणे, विवेक शिकलगार, मुन्ना चव्हाण, पुष्कराज जाधव, आशितोष घाटगे, शुभम हुग्णे, शुभम धर्मन्नावर यांचा समावेश आहे.

