इचलकरंजी / प्रतिनिधी
दि इचलकरंजी बार असोसिएशन, इचलकरंजी तर्फे नविन रुजू झालेल्या न्यायाधीशांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
नुतन न्यायाधिश जे. एल. गांधी यांचे स्वागत सिनिअर अॅड. अरुण बडवे यांनी केले. न्यायाधिश एम. ए. भोसले यांचे स्वागत सिनिअर अॅड. संजय गजबी यांनी केले. न्यायाधिश आर. एस. रोटे यांचे स्वागत सिनिअर अॅड. लालासाहेब गायकवाड यांनी केले. न्यायाधिश जी. एम. नदाफ यांचे स्वागत अॅड. सुखदेव महाजन यांनी केले. न्यायाधिश पी. एन. रोकडे यांचे स्वागत अॅड. दिगंबर निमणकर यांनी केले. न्यायाधिश आर. डी. खराटे यांचे स्वागत सिनिअर अॅड. डी.एम. लटके यांनी केले. न्यायाधिश डी. बी. साठे यांचे स्वागत अॅड. डी. के. कंदले यांनी केले. न्यायाधिश ए.एम. गायकवाड यांचे स्वागत अॅड. मृणाल माने यांनी केले. न्यायाधिश ए. आर. कुलकर्णी यांचे स्वागत सिनिअर अॅड. श्रीकांत शिंदे यांनी केले. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे विधी अधिकारी म्हणून नियुक्त झालेबद्दल अॅड. भावना देवडा यांचा सत्कार जिल्हा न्यायाधिश जे. एल. गांधी यांचे हस्ते करणेत आला. यावेळी इचलकरंजी मध्ये तातडीने न्यायसंकुल होणे आवश्यक असून त्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करणेचे आश्वासन जिल्हा व सत्र न्यायाधिश-१ जे. एल. गांधी व जिल्हा व सत्र न्यायाधिश-२ एम.ए. भोसले यांनी दिले. यावेळी सर्व न्यायाधिश यांनी आपला परिचय देऊन इचलकरंजी मध्ये कोर्ट कामांचा निपटारा वकिलांचे सहकार्याने जलद गतीने करणेसाठी प्रयत्नशील राहणेबाबत सांगितले.
यावेळी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी न्यायसंकुल कामाचा आढावा घेत प्रमुख जिल्हा न्यायाधिश के. बी. अग्रवाल, जिल्हा व सत्र न्यायाधिश – १ जे. एल. गांधी, जिल्हा न्यायाधिश क्र.२ एम. ए. भोसले, मुख्यमंत्री यांचे विशेष सचिव विकास खारगे (आय.ए.एस.), इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील, कोर्ट मॅनेजर खाडे, सर्व न्यायाधिश व वकिल संघटनेचे सर्व सदस्यांचे सहकार्याने न्यायसंकुलचे काम जलद गतीने करणेबाबत विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला प्रतिनिधी अॅड. हणबर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. अदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.

