रोटरी प्रोबस क्लबतर्फे पुरस्कार प्रदान

इचलकरंजी/ प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित रोटरी सेंट्रल एक्झिक्यूटिव्ह प्रोबस क्लब इचलकरंजी तर्फे डॉक्टर श्रीनिवास साखरपे, अभयकुमार बरगाले, मल्लू मगदूम व रामदास आमने या कुटुंबियांना आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी मेनचे अध्यक्ष संतोष पाटील या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व शोभा नवले यांना आदर्श गृहिणी पुरस्काराने रोटरी एन्सच्या अध्यक्षा सौ. सविता पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
त्यांनी आपल्या मनोगतात क्लबच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. सतीश पाटील यांनी प्रोबस क्लबच्या कार्याचे कौतुक करून हे पुरस्कार नव्या पिढीस प्रेरणा देतील, असे प्रतिपादन केले. संतोष पाटील यांनी नव्या पिढीने ज्येष्ठांकडून ज्ञान व अनुभवाची शिदोरी घेऊन वाटचाल करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी सेंट्रलचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते हे होते. त्यांनी मार्गदर्शन करताना रोटरी प्रोबसने समाजातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक इ. सर्वांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे कार्य केले आहे असे प्रतिपादन केले.
स्वागत सहसचिव सौ. प्रमोदिनी देशमाने यांनी केले. प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष अॅड. विश्वासराव चुडमुंगे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. विना श्रेष्ठी, किरण कटके, जुगलकिशोर तिवारी, सुनील कोष्टी, रामचंद्र निमणकर इत्यादींनी करून दिला. सूत्रसंचालन व शारदा कवठे यांनी केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष सूर्यकांत बिडकर, किरण बरगाले, हिमांशू मिरगे व मान्यवर तसेच सत्कार मूर्तीचे कुटुंबिय व मित्रमंडळी उपस्थित होते.

Scroll to Top