मिरज / प्रतिनिधी
सुवर्णमहोत्सवी रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या वतीने रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांच्या हस्ते शासकीय सेवेतील सात विभागांमधील १४ जणांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रोटरीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र फडके, सचिव हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर प्रमुख उपस्थित होते. डॉ. मयूरी फडके संचलित साई कथक नृत्यकला केंद्रातर्फे गणेश वंदना सादर करण्यात आली. नऊ वर्षे वृद्ध सेवा आश्रम चालवणारे डॉ. दिलीप शिंदे यांना रोटरी सेवा श्री पुरस्कार देण्यात आला. अग्निशमन विभागातील सुनील माळी व अविनाश चाळके, पोस्ट ऑफिसमधील महेश साखरे व पैगंबर नदाफ, राज्य परिवहनमधील अर्जुन घोळवे व शरद वायदंडे, महावितरण चे रामेश्वर सत्वधर व सचिन कोष्टी, हवालदार जाहीरहुसेन काझी व प्रतीक्षा भोसले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवीण चुडमुंगे व राजेंद्र बन्ने, रेल्वे कर्मचारी शुभांगी सावंत व अश्विनी दुकानदार यांना व्होकेशनल सर्व्हिस अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. रवींद्र फडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अॅड. बाळासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रोटरी क्लबचे सचिव डॉ. रियाज मुजावर यांनी आभार मानले.

