निपाणीतील योग शिबिराचा लाभ घ्या

निपाणी/प्रतिनिधी

पतंजली योग समिती-हरिद्वार व पतंजली योग समिती निपाणी यांच्या संयुक्त सहकार्याने समितीचे राज्य प्रभारी भवरलाल आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली येथे योग प्रशिक्षण शिबिरास एसबीएस कन्या शाळेत प्रारंभ झाला. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन भवरलाल आर्य यांनी केले.
स्वामी परमार्थ देव यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विविध आसनांचे सादरीकरण केले. दररोज सकाळी ५.३० पासून दोन तास चालणारे २४ मे पर्यंत चालणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिवाय शिबिरातून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने प्रशिक्षण चालणार आहे.
यावेळी किरण मन्त्रोळकर, बाळकृष्ण कोळेकर, शिवानंद मालगावे, जयवंत भाटले, प्रसन्नकुमार गुजर, प्रणव मानवी, विजय टवळे, दत्तात्रय जोत्रे, सुरेश शेट्टी, डॉ. स्नेहल पाटील, रवींद्र कदम, अरुण काशीदकर, प्रशांत रामनकट्टी, जी. डी. शिंदे, दशरथ कुंभार, विनायक शिप्पुरे, आशा तिळवे, सुप्रिया भुसारी, भुपेंद्र कुरबेटी, रवी खोत, सौ. शोभा, रुपेश कुंभार यांच्यासह संयोजक उपस्थित होते. अनिल श्रीखंडे यांनी सूत्रसंचालन केले.

Scroll to Top