कोल्हापूर / प्रतिनिधी
श्रीक्षेत्र कुंथुगिरी येथील प. पू. गणाधिपती गणधराचार्य श्री १०८ कुंथुसागरजी महाराज हे दक्षिणेतून कोल्हापूर असा विहार करत असून, तब्बल २० वर्षांनंतर कोल्हापुरात आगमन झाले. बिंदू चौक येथे जैन समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत बालाचार्य शांतिनंदीजी महाराज, ऐलाचार्य संमथ भद्र नंदीजी महाराज, मुनीश्री श्रमण नंदीजी महाराज, मुनिश्री प्रभाचंद्र नंदीजी महाराज श्री लक्ष्मीसेन जैन मठ कोल्हापूर येथे चौसष्ठ ऋध्दी विधानाचे आयोजन केले आहे.
यावेळी किरण तपकिरे व कुटुंबीय यांना पाद्यपूजेचा मान मिळाला. बिंदू चौक छ. शिवाजी महाराज चौक पापाची तिकटी लोणार गल्ली तेली गल्ली –पंचगंगा हॉस्पिटल रोड ते स्वस्तिश्री लक्ष्मीसेन जैन मठ अशी विहार पदयात्रा काढण्यात आली. भव्य मिरवणुकीने प. पू. गणाधिपती गणधराचार्य कुंथुसागरजी महाराज यांचा श्री लक्ष्मीसेन मठामध्ये प्रवेश झाला. यानिमित्त आयोजित चौसष्ठ ऋध्दी विधानाचे यजमान पद राकेश दत्तात्रय निल्ले यांच्याकडे आहे.
यावेळी विशाल शिराळकर, ईश्वर परमार, सुरेश रोटे, बाबुराव मगदूम, संजय आडके, सुरेश मगदूम, जैन मंदिराचे विश्वस्त, ज्वालामालिनी महिला मंडळ, तसेच सर्व मंदिरांतील महिला मंडळ उपस्थित होते.

