निर्माल्यापासून बनवली अगरबत्ती; पंढरपुरात चार प्रकारची अगरबत्ती उपलब्ध

पंढरपूर / प्रतिनिधी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. या अनुषंगाने निर्माल्या पासून तयार केलेली अगरबत्ती भाविकांना रविवारपासूनश्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते व सदस्यांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ झाला. यावेळी शकुंतलाताई नडगिरे, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, अॅड.माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी, शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पृथ्वीराज राऊत उपस्थित होते.
या निर्माल्या पासून निशिगंध, केशर चंदन, सोनचाफा, समर्थ इत्यादी चार प्रकारच्या अगरबत्ती तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याची प्रति नग ५० रुपये किंमत आहे. भाविकांना श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथील स्टॉल वरून अगरबत्ती उपलब्ध करून घेता येईल. या कामी ऋषिकेश भट्टड, प्रभव आरोमॅटिक्स, पंढरपूर यांचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. त्यांचेकडून श्रींच्या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, भाविकांना चांगल्या दर्जाची अगरबत्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Scroll to Top