कोल्हापूर / प्रतिनिधी
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीच्चा पुढाकार आणि सहभाग महत्वाचा असून प्रदूषण नियंत्रणासाठी रिसायकल आणि रियुजवर भर देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रक्षण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभाग आणि डी. वाय पाटील ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी या विषयावरील एक दिवसीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी डी. बाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हॉटेल सयाजी येथे झालेल्या या परिषदेत ‘टेक, मेक, डिस्पोजल आणि पुन्हा मेक’ हा विचार मांडण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रास्ताविकामध्ये परिषद आयोजित करण्यामागील भूमिका विषद केली.
ऋतुराज पाटील म्हणाले, पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध घटक काम करत आहे. १४० एमएलडी सांडपाण्यापैकी ११० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहकार्य केल्यास भविष्यात कोल्हापूर १०० टक्के प्रदूषण मुक्त शहर म्हणून राज्यात नावलौकिक मिळवेल असा विश्वास ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. या एकदिवसीय परिषदेत फंडामेंटल ऑफ एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट हेअर अँड सॉलिड वेस्ट आणि फंडामेंटल ऑफ वेस्ट वॉटर मॅनेजमेंट या दोन विषयांवर आयआयटी बॉम्बेचे टेक्निकल हेड इंद्रकांत झा यांनी विचार मांडले. एन्व्हायरमेंटल इकॉनोमी रिसायकलर्स जर्नी चॅलेंजेस अँड सक्सेस
स्टोरी या विषयावर टेक्नो वेस्ट मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण कापसे यांनी तर स्ट्रॅटेजी टू कॉम्बॅक्ट क्लायमेट चेंजेस इन महाराष्ट्र या विषयावर वातावरणीय बदल विभागाचे संचालक अभिजीत घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. डी. वाय. पाटील अभिवादन विद्यापीठाच्या आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिपा शर्मा यांनी एन्व्हायरमेंटल सस्टनेबिलिटी बाबत विचार मांडले. टेक्नोग्रीन सोल्युशन्स चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय ओझा यांनी पर्यावरण क्षेत्रातील संधी बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी जयवंत हजारे, सहसंचालक रवींद्र आंधळे, उदय गायकवाड, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के प्रथापन, सीएचआरओ श्रीलेखा साटम, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे ए खोत, डॉ. अजित पाटील उपस्थित होते. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी आभार मानले.
दरम्यान मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेस भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाबाबत महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.

