रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर होणार कारवाई – पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित

कोल्हापूर/प्रतिनिधी

निवडणूक शांततेत पार पडावी, समाजाला ज्यांच्यामुळे त्रास होतो, समाजात ज्यांच्यामुळे अशांतता पसरते, अशा ४० ते ५० व्यक्तींच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते म्हणाले, जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये यापूर्वी झालेल्या निवडणुकांत आचारसंहिता भंग करणारे किंवा निवडणूक कालावधीमध्ये ज्यांच्यावर – गुन्हे दाखल झाले आहेत, त्याची यादी तयार केली आहे. तसेच मागील तीन – वर्षांमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपींची यादीही तयार केली आहे. त्या व्यतिरिक्त सन २०२४ मध्ये गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची यादी तयार आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक दारूबंदी या कायद्याखाली गुन्हे दाखल असलेल्या व्यक्ती आणि ज्यांच्याविरोधात तडीपारचे प्रस्ताव दाखल आहेत, अशांची यादी करून या सर्वांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. प्रिव्हेंटिव्ह अॅक्शन प्लॅन पोलीस विभागातर्फे तयार केला आहे आणि पुढील दहा दिवसांमध्ये या सर्व गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई प्रशासनाच्या मदतीने केली जाईल. याव्यतिरिक्त विविध गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असणारे आरोपी जामिनावर बाहेर येतात, अशा ५३० आरोपींची यादीही तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

Scroll to Top