कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ नॅक A++ मानांकन व विद्यापीठ अनुदान आयोगाने कॅटेगिरी। दर्जा बहाल केल्याने एम.कॉम., एम.एस्सी. (गणित) या अभ्यासक्रमांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली असल्याची माहिती प्र. संचालक डॉ. के. बी. पाटील यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रतील एकमेव ऑनलाईन एम.बी.ए., एम.कॉम., एम.एस्सी (गणित) सुरू करणारे सार्वजनिक विद्यापीठ ठरले आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या पदवी इतर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या समकक्ष आहे. ऑनलाईन एम.कॉम. व एम.एस्सी (गणित), अभ्यासक्रम मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषद, विविध अधिकार मंडळे, कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव व्ही. बी. शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.
