आरुष पाटीलचे अबॅकस स्पर्धेत यश

मिरज / प्रतिनिधी

सिंगापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमध्ये मिरज येथील खाडे शैक्षणिक संकुलचा विद्यार्थी आरुष संदीप पाटील याने तृतीय क्रमांक संपादन करून यश मिळवले.
स्पर्धेमध्ये जगभरातून १४ देशातून विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. याबाबत संस्थेकडून माहिती देण्यात आली की, सदर स्पर्धेमध्ये अतिशय अवघड असे आव्हान विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. जिद्द, चिकाटी, मेहनत व सरावाने आरुष संदीप पाटील याने आव्हान पेलून दाखवले. आरुष सध्या खाडे शैक्षणिक संकुलामध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. स्पर्धेसाठी त्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ. सुरेश खाडे, सुमनताई खाडे, सुशांत खाडे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील, प्रदीप पाचोरे, पूर्वा पाचोरे, त्याचे आई-वडील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top