इस्लामपूर/प्रतिनिधी
इस्लामपूर येथील आधार हेल्थकेअर या हॉस्पिटलची दशकपूर्ती व नव्या स्व-वास्तूत स्थलांतर हा सोहळा शुक्रवार ता.९ मे रोजी संपन्न होणार आहे. हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभआम. जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असून या समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. अण्णासाहेब डांगे हे असणार आहेत. इस्लामपूर शहरात सलग दहा वर्ष अविरत रुग्ण सेवा देणाऱ्या या हॉस्पिटलने आपला ठसा ग्रामीण भागासह सामान्य नागरिकांच्यात उमटवला आहे.
सामाजिक जाणीव जपत या टीम आधार ने गेल्या दहा वर्षात उत्तमरित्या रुग्णसेवा देण्याबरोबर कोरोना काळात चांगल्या पद्धतीने काम केले होते. सामान्य रुग्ण केंद्रबिंदू मानून या हॉस्पिटलची वाटचाल सुरु आहे. शुक्रवार ता.९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अक्षर कॉलनी, रस्ता क्र. १०, इस्लामपूर येथे हा समारंभ सोहळा संपन्न होणार आहे. तरी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. योगेश वाठारकर, डॉ. सौ. ज्योती वाठारकर, डॉ. पवनसिंह नायकल (पाटील), डॉ. अतुल हुलवान यांच्यावतीने करण्यात आले आहे.

