येथील जुन्या इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात भुयारी गटारीची स्वच्छता करणाऱ्या सोमलिंग मडिलप्पा खतनाळे (रा. येलाज मळा) यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर कामगारांनी कामबंद ठेवून आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली व कारवाईची मागणी केली.
भुयारी गटारीतून पाण्याचा प्रवाह होत नसल्याने सोमलिंग खचनाळे हा कर्मचारी स्वच्छतेचे काम करीत होता. यावेळी कार्यकर्त्याने चेंबर काढू नकोस, पुढचे चेंबर काढ, असे सांगितले. खचनाळे याने हातातील काम संपल्यावर पुढचे चेंबरचे काम करतो, असे सांगितले. यामुळे चिडलेल्या त्या कार्यकत्यनि खोऱ्याने खचनाळे याला मारहाण केली.
