गृहोपयोगी वस्तू संच इचलकरंजीत मिळावे

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे शिरोळ व हातकणंगले तालुक्यासाठी स्वतंत्र सहायक कामगार आयुक्त कार्यालय आहे. ऑनलाईन पोर्टलवर इचलकरंजी हा स्वतंत्र विभाग म्हणून दाखवला जातो.
त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत गृहोपयोगी वस्तू व अत्यावश्यक संच इचलकरंजी येथेच वाटप करावे, या मागणीचे निवेदन कामगार संघटनांच्या वतीने आ. राहुल आवाडे यांना देण्यात आले.
आ. आवाडे यांनी यावेळी हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ या तालुक्यासाठी इचलकरंजी येथे गृहोपयोगी वस्तू व अत्यावश्यक संच वाटप करावे, अशा सूचना ठेकेदार व सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिल्या. शिष्टमंडळात मिश्रीलाल जाजू, आनंदा गुरव, मदन मुरगुडे, आकाश बनसोडे, महेश लोहार, राजेंद्र निकम आदींचा समावेश होता.

Scroll to Top