वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) तर्फे नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरने बलाढ्य मुंबई, नागपूर संघांचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. संघाच्या या कामगिरीबद्दल केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे व विफाच्या महिलाध्यक्षा मधुरिमाराजे यांनी खेळाडूंचा गौरव करून संघाला 1 लाख 33 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
विजयी संघात जयकुमार मेथे व यशराज नलवडे, विशाल पाटील, ऋतुराज संकपाळ, शाहिद महालकरी, करण चव्हाण-बंदरे, सागर पोवार, खुर्शीद अली, दर्शन पाटील, रोहित जाधव, निरंजन कामते, प्रभू पोवार, सिद्धेश साळोखे, युनूस पठाण, आकाश बावकर, यासीन नदाफ, शुभम देसाई, नयन सूर्यवंशी, केदार साळोखे, सिद्धेश पंदारे, सत्यन पाटील हर्षल चौगुले, प्रशिक्षक केतन आडनाईक, अनिल अडसळे यांचा समावेश होता. सर्वांना प्रा. अमर सासने, नितीन जाधव, निखिल कदम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडू, प्रशिक्षकांना कास्को फुटबॉल देण्यात आले. यावेळी के.एस.ए.चे सचिव माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी, नितीन जाधव, नील पंडित, विश्वंभर मालेकर, दीपक घोडके, प्रदीप साळोखे उपस्थित होते.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर जिल्हा सबज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. 5 मे रोजी सकाळी 7 वाजता, छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा होईल. यातून निवडलेला संघ धुळे (शिरपूर) येथील राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहे. ज्या मुलींचा जन्म 1 जानेवारी 2012 ते 21 डिसेंबर 2013 दरम्यानचा आहे. त्यांनी निवड चाचणीस फुटबॉल किट व सत्यप्रत जन्म दाखल्यासह उपस्थित रहावे.

