कुत्र्यांच्या झुंडीचा बालकावर हल्ला

सांगली / प्रतिनिधी

दहा कुत्र्यांच्या टोळक्याने एका पाचवर्षीय बालकाला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. मांडी, पोटरीचे लचके तोडले. वेळीच काही तरुण धावले आणि कुत्र्यांना हुसकावून लावल्यामुळे बालक बचावले. ही घटना महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रासमोर घडली. या प्रकाराने महापालिका क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांचा उच्छाद पुन्हा समोर आला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक बालके जखमी झाली आहेत. मात्र, महापालिकेकडून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होताना दिसत नाही.

Scroll to Top