अरुण विद्यामंदिरचा कौतुकास्पद उपक्रम

इचलकरंजी / प्रतिनिधी

अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडी इचलकरंजी या शाळेत चिमुकल्यांचा बाजारहाट हा उपक्रम राबविण्यात आला. व्यहारज्ञानआणि उद्योजकतेचे महत्य समजावे यासाठी बालवाडी ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी शालेय आवारात छोटासा बाजार भरवला .
या बाजारात विद्यानांनी भाज्या,योगी पाककलेचे विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार खरेदी विक्री, ग्राहकांशी संवाद, नफा तोट्याचे गणित करता आले. चिमुकल्याने ग्राहकांच्या रूपात शिक्षक पालक आणि मित्रांना सहभागी करुन घेतले. बाजारच्या आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले, मायेचे आशोकराव स्वामी, मार्गदर्शिका सौ. अॅड. अलका स्वामी, संस्थाचे सेक्रेटरी संग्राम स्थानी, श्री. मानसा स्वामी, पालकवर्ग यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

Scroll to Top