हातकणंगले /प्रतिनिधी
कुंभोज (ता . हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रेमाच्या जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी प्रितम कुबेर खोत (रा. कुंभोज ) याच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . याबाबतची फिर्याद अल्पवयीत मुलीच्या वडीलांनी दिली आहे .
याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी कि , कुंभोज येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी जाण्यासाठी वडिलांची वाट पाहत हातकणंगले एसटी स्टँडवर गुरुवारी ता . १७ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास थांबली होती . यावेळी प्रितम खोत हा तीच्या एस .टी .चा पाठलाग करत तेथे आला व मला तुझ्याशी बोलायचे आहे बोलत का नाहीस असे म्हणत तीला प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करत असताना तीचे वडील नेण्यासाठी आल्याचे पाहून पळून गेला यानंतर मुलीने प्रितम हा दररोज पाठलाग करून त्रास देत असल्याचे सांगिल्याने तिच्या वडीलानी हातकणंगले पोलीसात प्रितम खोत याच्या विरोधात तक्रार दाखल केली . त्यानुसार पोलीसानी त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे . अधिक तपास पोलीस करत आहेत .