पेठवडगाव / प्रतिनिधी

येथील एसटी स्टँडसमोर इमारतीसाठी खोदलेल्या खड्यातील पाण्यात मगरीच्या पिलाचे दर्शन झाले. सायंकाळपर्यंत शोध घेऊनही पिलू हाती लागले नाही. एसटी स्टँडसमोर मोकळी जागा आहे. या जागेत इमारत बांधकामासाठी खड्डे खोदले आहेत. हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. त्यातील एका खड्ड्याच्या काठावर तीन फूट लांबीचे मगरीचे पिलू उन्हात पहुडल्याचे युवकाच्या निदर्शनास आले. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली पण पिलू दिसून आले नाही. सायंकाळपर्यंत या पिलाचा शोध सुरू होता.
