कोरोची /प्रतिनिधी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मदन करंडे यांनी संपर्क दौरा सुरू केला आहे. या दरम्यान त्यांनी कोरोची येथील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये संपर्क दौरा पूर्ण केला. या ठिकाणी असणारे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार मदन करंडे यांनी आपला संपर्क दौरा सुरू केला आहे. कोरोची दौऱ्यावर असलेले मदन करंडे यांनी नव्यानेच पक्षात समाविष्ट झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे यांचे निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या निवासस्थानी विविध कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी देवानंद कांबळे यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी कोरोची परिसरातील जनता ठाम उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच विकास आघाडीचे संभाव्य उमेदवार मदन कारंडे यांना मताधिक्य देण्याचे आश्वासन ही यावेळी दिले. यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष रणजीत शिंदे, संभाजी सूर्यवंशी आर्दीसह नागरीक उपस्थित होते.