तळसंदेत शालेय मल्लखांब स्पर्धा उत्साहात

तळसंदे (ता. हातकणंगले) येथील शामराव पाटील शिक्षण समुहामध्ये जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण शामराव पाटील शिक्षण समूहाचे संस्थापक प्रा.आण्णासाहेब पाटील, अध्यक्षा प्रा. रुपाली पाटील यांच्या हस्ते झाले.

स्वागत व प्रास्ताविक विवेकानंद हिरेमठ यांनी यांनी केले. स्पर्धेमध्ये १३२ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणेः १४ वर्षाखालील मुले- हर्षवर्धन सावंत (छ. शिवाजी विद्यानिकेतन पेठ वडगाव), अविष्कार बनकर (न्यू इंग्लिश स्कूल यवलुज), अथर्व कोळी (न्यू इंग्लिश स्कूल शिरोळ). १७ वर्षाखालील मुले शार्दुल जोशी (व्यंकटेश्वरा हायस्कूल कबनूर), सुमित रवळेकर (वारणा व्हॅली तळसंदे), प्रज्वल कारंडे (छ. शिवाजी विद्यानिकेतन पेठ वडगाव).१९ वर्षांखालील मुले श्लोक पोवार (श्रीपतराव चौगुले कॉलेज माळवाडी), सम्राट कस्तुरे (पाराशर हायस्कूल पारगाव), श्रेयस पाटील (यशवंत हायस्कूल कोडोली). १४ वर्षाखालील मुली धन्वंतरी शिंदे (कडगाव हायस्कूल कडगाव), अनुपमा पाटील (हेरवाड हायस्कूल हेरवाड), रचना पाटील (विद्यामंदिर हिरवडे). १७ वर्षांखालील मुली – श्रेया पाटील (कुरुकली हायस्कूल कुरुकली), अंजली टाकळे (सीताबाई पटवर्धन हायस्कूल कुरुंदवाड), अनविका पाटील (कुरुकली हायस्कूल कुरुकली). १९ वर्षांखालील मुली- जयश्री गायकवाड (श्रीपतराव चौगुले कॉलेज माळवाडी), रसिका पाटील (कुरुकली हायस्कूल कुरुकली), नम्रता सुतार (कुरुकली हायस्कूल कुरुकली). विजेत्या खेळाडूंची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

Scroll to Top