चार दिवसांनी मिळाला तरुणाचा मृतदेह

माणगाव/प्रतिनिधी

दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन करताना माणगाव ता. हातकणगंले येथील कार्यकर्ते नदीपात्रातून वाहून गेले होते. यातील
प्रकाश शिवाजी परीट (वय ३५) हा युवक शनिवार दि.१२ रोजी रूई बंधारा येथून वाहून गेला होता. त्याचा मृतदेह तब्बल चार दिवसांनी खिद्रापूर येथील बंधारानजीक बुधवार दि.१६ रोजी आढळून आला. रूई येथील पंचगंगा नदीवरील बंधारा नजीक मंडळाचे कार्यकर्ते गेले असता मूर्ती विसर्जन करताना परीटसह सहा कार्यकर्ते पोहत नदीपात्रातून बाहेर आले. मात्र प्रकाश परीट हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला होता. प्रकाशच्या मृतदेहाचा गेल्या चार दिवसांपासून शोध सुरु होता. दरम्यान, बुधवार दि.१६ रोजी परीट याचा मृतदेह खिद्रापूर येथे नदीपात्रात आढळून आला.
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा माणगाव येथे प्रकाश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे.

Scroll to Top