अखेर मान्सूनने घेतला निरोप

विशेष प्रतिनिधी

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मान्सूनने देशाचा काल अखेर निरोप घेतला. महाराष्ट्रासह देशाच्या सर्व भागांतून मान्सून बाहेर पडला आहे. तर, दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय झाला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांत पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनने यंदा आपल्या सरासरी वेळेच्या तुलनेत उशिरा परतीचा प्रवास सुरू केला. मान्सून यंदा २३ सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला निघाला होता. त्यानंतर प्रवासात मुक्काम करत अखेर मंगळवारी मान्सूनने देशाचा निरोप घेतला. मान्सूनचा परतीचा प्रवास जरी उशिरा सुरू झाला तरी मान्सूनने वेळेत देशाचा निरोप घेतला आहे.

Scroll to Top