इचलकरंजी मध्ये झालेल्या हाणामारीत दोघे जखमी

इचलकरंजी/प्रतिनिधी

इचलकरंजी येथील जवाहरनगर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये झालेल्या मारहाणीत एका महिलेसह दोघेजण जखमी झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून चौघा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. जवाहनगर परिसरातील पोस्ट ऑफिस परिसरातील दिलीप भाऊसो गावडे (वय ६३) व अजय राजेंद्र सुतार (वय ३७) यांच्यात जुना वाद आहे. गावडे हे रविवारी सकाळी सूर्या चौकातील पानपट्टीत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या सुतार याने त्यांना शिवीगाळ करत विटेने गावडे यांच्या तोंडावर मारहाण केली. त्यामध्ये गावडे जखमी झाले. या प्रकरणी अजय सुतार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जवाहरनगर परिसरातील हनुमाननगर फकीर मळा परिसरातील सलमा हसन शेख (वय ३९) या ११ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक कूपनलिकेचे बटन बंद करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी संशयित शबाना हुसेन शेख (वय ४०),अरबाज लियाकत शिरढोणे (वय २२) व इलियास हुसेन शेख (वय २२, तिघे रा. फकीर मळा) यांनी सलमा शेख यांना शिवीगाळ करत दगड डोक्यात मारला. त्यामध्ये सलमा या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Scroll to Top