गडहिंग्लज/प्रतिनिधी
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या आयोजित स्मार्टस्पार्क १.० ही स्पर्धा उत्साहात पार पडली. संस्थेच्या सचिव प्रा. स्वाती कोरी अध्यक्षस्थानी होत्या. प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांनी स्वागत केले. महाराष्ट्र व कर्नाटकातील महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत ७० हून अधिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली.
स्वाती कोरी म्हणाल्या, स्पर्धेचा मुख्य उद्देश नव्या पिढीतील तंत्रज्ञानप्रेमी आणि नवोपक्रमशील विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून ब्देणे हा होता. मनीष कुलकर्णी यांनी स्पर्धेचे प्रशिक्षण केले. तसेच, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात असणारे महत्त्व, रोजगार संधी व या क्षेत्रात होणारी क्रांती यिवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने तयार केलेली उत्पादने सादर करण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अवधूत आपटे, वैष्णवी मलमकर (डॉ. शिंदे अभियांत्रिकी भडगाव) व मनीष बोकरे, ओंकार यादव (व्ही. एस. एम. निपाणी), द्वितीय क्रमांक गणेश बोरगल्ली (एस. जे. पी. एन. निडसोशी) व राम व्हंजी, सुमित जाधव (डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निक), तृतीय क्रमांक सोहन सावंत, समर्थ कुंभार (एस.जी.एम. पॉलिटेक्निक) व दर्शन बेन्डीकर, पृथ्वी गिड्ड (सी. बी. कोरे पॉलिटेकनिक चिक्कोडी) यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रा. श्वेता भोई यांनी नियोजन केले. यावेळी सल्लागार महेश कोरी, प्रा. वीरेश मठद, हेमंत करिगार, महादेव बंदी आदी उपस्थित होते. प्रा. इरफान त्रासगर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अभिषेक मगदूम यांनी आभार मानले.
