शिरढोण ऊरुसानिमित्त विविध कार्यक्रम

शिरढोण/प्रतिनिधी

शिरढोण (ता. शिरोळ) येथील जागृत देवस्थान हजरत पीर मुश्किले आसान बाबा यांचा उरूस ८ ते ११ मे २०२५ अखेर साजरा होत आहे. उरुसा निमित्त चार दिवस भरगच्च कार्यक्रम उरूस कमिटी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, देणगीदार यांच्या सहकार्याने होणार आहेत. यामुळे भाविकांसह नागरिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
सालाबाद प्रमाणे हजरत पीर मुश्किले आसान बाबा यांच्या उरूसानिमित्त गुरुवारी ८ मे रोजी गंधरात्र, रात्री ऑर्केस्ट्रा धमाका, शुक्रवारी ९ मे रोजी उरूसाचा मुख्य दिवस मुश्किले बाबांना गलिफ अर्पण करणे, तर रात्री ऑर्केस्ट्रा झंकार बिटस यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम, शनिवारी १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता जंगी निकाली कुस्त्या, तर रात्री शबनम बानू (इचलकरंजी) व तौसिफ जुनैदी (पुणे) यांचा कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे.
सोमवारी ११ मे रोजी रात्री माळभाग शिरढोण येथे ऑर्केस्ट्रा सारेगमप होणार आहे. सरपंच भास्कर कुंभार, उपसरपंच शिवानंद कोरबु उरूस कमिटीचे अध्यक्ष अरुण ऐनापुरे, उपाध्यक्ष अजित पाटील, असलम मुजावर, खजिनदार संजय गुरव, गुरव, शहाबुद्दीन टाकवडे, शाहीर बानदार, रोहन हेरवाडे, पंकज सासने, प्रशांत सासने, उमेश माने यांच्यासह उरूस कमिटीचे, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ ऊरूसाचे नेटके नियोजन करीत आहेत.

Scroll to Top