कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाची सार्वजनिक सुट्टी, त्यानंतर जोडून आलेला शनिवार व रविवार अशा सलग सुट्टीमुळे गेल्या तीन दिवसांत कोल्हापुरात पर्यटकांची मांदियाळी होती. तीन दिवसांत ३ लाखांवर पर्यटक भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद झाली. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजली.
सध्या शाळेला उन्हाळी सुट्टया असल्याने र्यटकांची संख्या वाढली आहे. रविवारी पहाटे पाचपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मुख्य दर्शनरांगेबरोबरच अंबाबाईच्या मुखदर्शनाची रांगही वाढली होती.
पार्किंगसाठी वाहनांच्या रांगा महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेशातून भाविक मोठ्या संख्येने आले होते. करवीर वाचन मंदिरपासून बिंदू चौकापर्यंत पार्किंगसाठी वाहनांच्या रांग लागल्या होती.
पर्यटकांची जेवणासाठी धावाधाव गर्दीमुळे शनिवारी व रविवारीबहुतांशी हॉटेलमधील जेवण संपले. यात्री निवास, हॉटेल्स येथील रूम बुकिंगही फुल्ल झाले होते. त्यामुळे पर्यटकांना जेवण व निवास या सुविधांसाठी धावाधाव करावी लागल्याचे चित्र होते.

