जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात सलग दोन दिवस किरणोत्सव झाला. बऱ्याच वर्षानंतर हा किरणोत्सव झाल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सलग पाच दिवस हा किरणोत्सव होईल, असे मत देवालय ट्रस्टने व्यक्त केले आहे.
सोमवार आणि मंगळवार रोजी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी सूर्यप्रकाशाची सोनेरी किरणे थेट ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज आणि शिवपिंडीवर पडले होते. बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच हा किरणोत्सव झाला. यापुढेही गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस असा एकूण पाच दिवस हा किरणोत्सव होईल, असा अंदाज श्री सिद्धराज देवालय ट्रस्टचे अध्यक्ष शामराव बंडगर, उपाध्यक्ष राजेंद्र शहापुरे, संभाजी मोरे, गजानन आंबेकर, बबन हातळगे, संजय पाटील-यड्रावकर, अमरसिंह निकम, रमेश देशपांडे, शामसुंदर मालू, राजेंद्र दाईंगडे, संजय कुलकर्णी आनंदकिशोर मालू यांनी व्यक्त केला आहे. बऱ्याच वर्षानंतर होणाऱ्या या किरणोत्सवाचा पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवालय ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी व्यवस्थापक सचिन कानवडे, संजय तिवडे, अतुल भोजने, आप्पासो निशाणवार आदी उपस्थित होते.

