इचलकरंजी महापालिकेत ‘सेवा हक्क दिना’ निमित्त शपथविधी कार्यक्रम

इचलकरंजी / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार २८ एप्रिल हा सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या अनुषंगाने सोमवारी इचलकरंजी महापालिकेच्या वतीने सेवा हक्क दिन तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्तीचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महापालिकेच्या सभागृहात उपायुक्त नंदू परळकर आणि सहायक आयुक्त रोशनी गोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा हक्काची बांधिलकी मानणारी शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, कार्यालयीन अधीक्षक प्रियांका बनसोडे, महिला व बालकल्याण अधिकारी सीमा धुमाळ, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, अभियंता बाजी कांबळे, शीतल पाटील, गौस जमादार, रामचंद्र कांबळे, गणेश शिंदे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सेवा हक्काबद्दल जनजागृती करताना, नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्याचे आणि प्रशासनात पारदर्शकता व कार्यक्षमतेचा उच्च आदर्श प्रस्थापित करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

Scroll to Top