उदगावमधील हनुमान पाणीपुरवठा संस्थेत गणपतराव पाटलांना धक्का

जयसिंगपूर / प्रतिनिधी

उदगाव (ता. शिरोळ) येथील हनुमान पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक रविवारी पार पडली. या निवडणुकीत संस्थापक चेअरमन बाबुराव कोरे शेतकरी विकास पॅनेलने हनुमान विकास पॅनेलला धक्का देत १० जागांवर विजय मिळविला, तर सत्ताधारी गटाला फक्त ३ जागा मिळाल्या. सत्ताधारी गणपतराव पाटील गटाला धक्का बसत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाच्या ताब्यात ही संस्था आली.
निवडून आलेले नूतन संचालक असे सर्जेराव बापू कदम, राजकुमार देवाप्पा कोरे, बाळासो कल्लाप्पा चौगुले, सचिन सुरगोंडा पाटील, सुरेश भूपाल पाटील, ओंकार प्रकाश फडतारे, संतोष आण्णासो मगदूम, श्रीपाल बाळू वराटे, नुरुद्दीन गुलाब मुजावर, निलुबाई तुकाराम शिंदे, रूपाली बाबासो मगदूम, राजाराम संतु बंडगर, पांडुरंग श्रीपती चंदुरे (बिनविरोध). आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

Scroll to Top