पन्हाळा / प्रतिनिधी
पन्हाळा गड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा साक्षीदार. अशा ऐतिहासिक गडावर शिवजयंतीची सुरुवात अत्यंत भक्तिभावाने व सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आली. राजर्षी शाहू तरुण मंडळ, संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीने शिवछत्रपतींच्या मंदिरात अभिषेक सोहळा आणि स्वच्छता मोहीम राबवून शिवजयंतीचा प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पन्हाळगडावरील शिवमंदिरात ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक आली. करून करण्यात या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष अक्षय पोवार, संतोष माळी, अभिषेक कित्तूर, शुभम जाधव, जॉईंट सेक्रेटरी सौरभ जौंदाळ आदी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

