महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे जयसिंगपुरात उत्स्फूर्त स्वागत

जयसिंगपूर / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने पन्हाळगडावरून काढण्यात आलेली महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे जयसिंगपूर येथील क्रांती चौकात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नृसिंहवाडी येथील नदी संगमाच्या पाण्याचे कलश मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द करून रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार इद्रिस नायकवडी, युवराज पाटील, संतोष धुमाळ (पन्हाळा), विकास पाटील (कागल), शिरोळ तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर, विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष अमरसिंह पाटील, अजय पाटील-यड्रावकर, शहराध्यक्ष असलम फरास, कुरूंदवाड शहराध्यक्ष राजू घारे आदी उपस्थित होते. ही गौरव रथयात्रा सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुपूर्द करण्यात आली.

Scroll to Top