कुरुंदवाड परिसरात गारांसह पाऊस

कुरुंदवाडसह परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गारांसह जोरदार वळीव पाऊस झाला. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये उडीद, केळी पिकाचे आणि वीट भट्टी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास साडेचारच्या दरम्यान विजा चमकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर थोड्याच वेळात जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही भागांत गारांचा वर्षाव झाला. या पावसामुळे उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद पीक सध्या फुलोर्‍यावर आहेत. अशा वेळी झालेल्या गारपिटीमुळे फुले गळून पडली आहेत. परिणामी, उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

वीटभट्टी व्यवसाय तेजीत असतानाच अचानक पावसाने झोडपल्याने विटांवर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी विटा फुटून खराब झाल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठेे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीटभट्टी परिसर जलमय झाल्यामुळे काम बंद ठेवावे लागले आहे. खिद्रापूर व राजापूर परिसरात या वादळी वार्‍यामुळे केळीची झाडे मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडली आहेत.

Scroll to Top