जन्म-मृत्यूची ठेवण्याचा छंद जोपासणारा अवलिया रेकॉर्ड मॅन

कबनूर / प्रतिनिधी

प्रत्येकाच्या व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळे छंद असतात असाच एक छंद जोपासणारा अगं वेगळं व्यक्तिमत्व आण्णाप्पा शिवाप्पा चौगुले, रा. कबनूर, गावभाग वॉड नं. २, महादेव मंदिर मागे, मुळगाव शिरढोण यांना जन्म-मृत्यू वाढदिवस यांच्या तारखा नोंद करण्याचा अजब छद आहे.
१९७५ पासून ते आज अखेर म्हणजे २०२५ पर्यंत डायऱ्या नोंद आहेत. म्हणून त्यांना रेकॉर्ड मॅन व डायरी मॅन म्हणून ओळखले जाते. पंचगंगा साखर कारखान्यात १९७२ ते २०१० पर्यंत नोकरी करून ते सेवा निवृत्त झाले आहेत. आपल्या ४० वर्षाच्या नोकरीत प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे काम केले आहे. यातून त्यांनी आपल्या तीन मुलांना उच्च शिक्षण दिले आहे. कोणाचा लग्न असतो. वाढदिवस असो, दुकानाचा वर्धापन दिन असतो. त्यांना घरी जाऊन गुलाब पुष्प देणे किंवा फोन करणे अभिनंदन पत्र देणे, सायकलणे प्रवास करत स्वतःकडील पैसे खर्च करत त्यांनी हा आपला छंद जोपासला आहे.

आतापर्यंत त्यांनी १४७५ पत्रे लिहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, मंत्री जयंत पाटील, माजी आम. हाळवणकर, माजी आम. प्रकाश आवाडे, माजी खास, कल्लाप्पाण्णा आवाडे, राजू शेट्टी, आम, राजेंद्र पाटील-यड्रावकर या मान्यवरांबरोबरच कबनूर, रूई, साजणी, तारदाळ, हातकणंगले, आळते येथील सरपंच व सदस्यांना पोष्टाने पत्रे पाठवून त्यांच्याशी पत्र व्यवहार केला आहे. तसेच १०, १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिले आहे.. याचबरोबर शांतीनाथ पतसंस्था, इंदिरा पत संस्था येथील क्लार्क व अधिकाऱ्यांच्या तारखा त्यांना माहित नसतात पण त्याची नोंद चौगुले यांच्याकडे असते. आयुष्याच्या शेवटपर्यंत हा छंद जोपासण्याची इच्छा चौगुले यांची आहे.

Scroll to Top